Shirur : निमगाव भोगी मध्ये शाळेत चोरीकरणाऱ्या स्थानिक तरुणांना अटक

Shirur

Shirur

शिरूर दिनांक  (प्रतिनिधी )

 निमगाव भोगी तालुका शिरूर येथील शाळेवर गावातील तरुणांनीच मारला डल्ला ऑनलाईन शिक्षणाचे 32 टँब, बॅटरी, तेल पुडे व स्पीकर मशीन चोरी प्रकरणात दोन जणांना रांजणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला असल्याची माहिती आरोपींना रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी दिली आहे.आरोपींना शिरूर न्यायालयात हजर केले असता त्यांना 31 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कस्टडी मिळाली आहे.

आकाश उर्फ राजू काशिनाथ चव्हाण (वय २४) व संदिप मनोहर रासकर (वय २० दोघे राहणार निमगाव भोगी त ता शिरूर जिल्हा पुणे)यांना अटक केली असून दोघांनी चोरीची कबुली दिली असून चोरीचा मालही पोलिसांना दिला आहे.

ही चोरीची घटना 20 ऑक्टोबर सायंकाळी 5 ते 21 ऑक्टोबर सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली होती.

      याबाबत पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे कोरोना संसर्ग काळात शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण चालू असताना मुलांचे अभ्यासाचे टँब  तसेच शालेय पोषण आहार  २१ ऑक्‍टोबर २०२० रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळा बंद असल्याचा गैरफायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाच्या दरवाजा तोडून  मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेले टँब , तसेच शालेय पोषण आहाराचे तेलाचे त्रेचाळीस पुडे , इन्वर्टर च्या दोन बँट-या , स्पीकर मशीन असा १ लाख ५४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या बाबत रांजणगाव पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवताच गावातीलच काही चोरट्यांनी हा प्रकार केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांना बातमी दाराकडून मिळाल्यानंतर सदर तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख बारामती विभागाचे विभाग प्रमुख मिलिंद मोहिते दौड विभागाचे विभागीय अधिकारी राहुल धस यांच्या सूचनेनुसार व पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस कर्मचारी  प्रफुल्ल  भगत ,  मंगेश थिगळे , अजित भुजबळ रघुनाथ हळनोर या पथकाने  आकाश उर्फ राजू काशिनाथ चव्हाण (वय २४) व संदिप मनोहर रासकर (वय २०) राहणार निमगाव भोगी यांना ताब्यात घेउन पोलिसी खाक्या दाखवतात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात चोरी गेलेल्या आय बॉल कंपनीचे तीस टॅब, तेवीस तेलाचे पुडे, दोन बॅटऱ्या, अहुजा कंपनीचे स्पीकर मशीन, असा एकूण एक लाख 44 हजार 685 रुपयांचा ऐवज पोलिसांनी आरोपींकडून ताब्यात घेतले आहे.

 पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तुषार पंधारे  हे करत आहेत.


1 thought on “Shirur : निमगाव भोगी मध्ये शाळेत चोरीकरणाऱ्या स्थानिक तरुणांना अटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed