Shirur : शिरूर तालुक्यातील 39 गावात  280 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 6 जणांचा मृत्यू


Shirur

शिरूर दिनांक प्रतिनिधी

     शिरूर तालुक्यातील 39 गावात  280 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी दिली असून शिरूर तालुक्यात वाढता कोरोना बाधित यांचा आकडा चिंताजनक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

      शिरूर तालुक्यात आजपर्यंत 12154 कोरोना बाधित रुग्ण आढळले, 9273 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोना वर मात केली. 201 जणांचा मृत्यू झाला, 2680 विविध रुग्णालयात उपचार घेत आहे171 आज बरे झाले आहेत.

       शिरूर तालुक्यात आज सनसवाडी 15, शिक्रापूर 40,  तळेगाव ढमढेरे 14, निमगाव म्हाळुंगी 4, पारोडी 2, टाकळी भिमा 3, बुरुंजवाडी 12, कोरेगाव भीमा 13, गणेगाव खालसा 2, रांजणगाव गणपती 10, ढोक सांगवी 2, मांडवगण फराटा 2, पिंपळसुटी 1, शिरसगाव काटा 7, तांदळी 2, न्हावरे 8, उरळगाव 4,नागरगाव 3, रांजणगाव सांडस 3,निर्वी 2,आंबळे 8,टाकळी हाजी 1, कारेगाव 6, शिरूर ग्रामीण 27, आमदाबाद 4, सरदवाडी 5, गोलेगाव 1 , तरडोबाचीवाडी 5,करडे 1, मलठण 8, कर्डेलवाडी 3, निमगाव भोगी 1, मोराची चिंचोली 2, कवठे यमाई 1, केंदुर 3, पिंपळे धुमाळ 1, पाबळ 4, हिवरे 4, शिरूर ग्रामीण 37 असे शिरूर तालुक्यातील 39 गावात 280 कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर 6 जणांचा मृत्यू झाला.

शिरूर तालुक्यात वाढता करोना बाधितचा आकडा चिंताजनक असून, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क लावूने, गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सोशल डिस्टेंस पाळावे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन कराव असे आव्हान शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे.

*पुणे जिल्हाधिकारी यांनी रेमडेसिवीर साठी कंट्रोल रूमची स्थापना केली आहे. ज्यांना इंजेक्शन हवे असतील त्यांनी 020-26123371 किंवा 1077 (टोल-फ्री) या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आव्हान शिरूर प्रांत संतोष कुमार देशमुख व तहसीलदार लैला शेख यांनी केले आहे.11 एप्रिल ते 31 मे 2021 पर्यंत ही कंट्रोल रूम कार्यान्वित राहील.*

 


1 thought on “Shirur : शिरूर तालुक्यातील 39 गावात  280 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 6 जणांचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed