Shirur : पुणे जिल्हा अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या पाठपुराव्यास आले यश


Shirur

शिरूर ( प्रतीनिधी ) –

 शासन परिपत्रकामध्ये नमुद तरतुदीचा लाभ देण्याच्या दृष्टीने कुंभार समाजास माती वाहतुक परवाने निर्गत करण्याच्या पद्धतीत सुसूत्रता यावी याकरीता तहसिल पातळीवर तलाठी व मंडल अधिकारी यांचे मार्फत सर्वेक्षण करुण परंपरागत कुंभार व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजातील व्यक्तींची गाव निहाय यादी करावी सदर यादी तयार करताना जातीचे दाखले असलेल्या व्यक्तींची व जातीचे दाखले नसलेल्या व्यक्तींची स्वतंत्र यादी करावी तसेच तालुक्यातील पीढीजात व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजातील ज्या व्यक्तींकडे जातीचे दाखले नाहीत अशा व्यक्तींना जातीचे दाखले देण्यासाठी तालुका स्तरावर स्वतंत्र शिबीर आयोजीत करावे असे आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिले आहे.

अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनरावजी जगदाळे यांच्या नेतत्वाखाली २१/०१/ २०१९ च्या शासन परिपत्रकाच्या अंमलबजावणी साठी संपुर्ण महाराष्ट्रात पाठपुरावा सुरू होता त्याला यश आले आहे.

      पुण्याचे जिल्हाधिकारी यांना विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनजी जगदाळे, माती कला बोर्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ताशेठ डाळजकर,प्रदेश अध्यक्ष शामशेठ राजे, वरिष्ठ प्रदेश कार्याध्यक्ष संतोष पाषाणकर, प्रदेश उपाध्यक्ष किसन काळे,प्रदेश संघटक प्रकाश कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हाध्यक्ष नथुशेठ कुंभार,जिल्हासचिव भगवान रामचंद्र श्रीमंदिलकर,युवक जिल्हाध्यक्ष मयुर कुंभार, पुणे शहराध्यक्ष जालिंदर कुंभार यांच्यासह जिल्हयातील तालुकाध्यक्ष,पदाधिकारी हे निवेदन देऊन समक्ष भेटून पाठपुरावा करत होते.अखेर दिनांक २५/०३/२०२१ रोजी पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील प्रांत आधिकारी व तहसिलदार यांना आदेश काढले. शासन परिपत्रकामध्ये नमुद तरतुदीचा लाभ देण्याच्या दृष्टीने कुंभार समाजास माती वाहतुक परवाने निर्गत करण्याच्या पद्धतीत सुसूत्रता यावी याकरीता तहसिल पातळीवर तलाठी व मंडल अधिकारी यांचे मार्फत सर्वेक्षण करुण परंपरागत कुंभार व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजातील व्यक्तींची गाव निहाय यादी करावी सदर यादी तयार करताना जातीचे दाखले असलेल्या व्यक्तींची व जातीचे दाखले नसलेल्या व्यक्तींची स्वतंत्र यादी करावी तसेच तालुक्यातील पीढीजात व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजातील ज्या व्यक्तींकडे जातीचे दाखले नाहीत अशा व्यक्तींना जातीचे दाखले देण्यासाठी तालुका स्तरावर स्वतंत्र शिबीर आयोजीत करावे असे आदेशात म्हटले आहे.

               त्याच अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी तालुका स्तरावर तहसिलदार यांना शासन परिपत्रक व आदेशाची प्रती देण्यात आल्या.

    कुंभार समाजाचा अनेक दिवसांचा पलबींत प्रश्नांची जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख साहेब यांनी तातडीने दखल घेऊन अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांना दखल घेण्याची सुचना दिली. तसेच अप्पर जिल्हाधिकारी यांनी प्रांत आधिकारी व तहसिलदार यांना आदेश काढूण तत्काळ दखल घेतली. जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांचे अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था पुणे जिल्हा शतशः ऋणी राहिल.

नथुशेठ कुंभार ( पिरगुंटकर )

पुणे जिल्हाध्यक्ष

अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील समाज बांधवांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना सुमारे १४४ इलेक्ट्रीक चाकांचे वाटप केले. तसेच समाज बांधवांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी विकास संस्था कटीबद्ध असुन ते तातडीने सोडविण्यासाठी सदैव प्रयत्न करत राहु.

भगवान रामचंद्र श्रीमंदिलकर

सचिव,पुणे जिल्हा

 


1 thought on “Shirur : पुणे जिल्हा अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या पाठपुराव्यास आले यश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed