Shirur : शामकांत चकोर यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या. पक्षवाढीसाठी प्रयत्न केले.त्यांच्या जाण्याने भाजपचे मोठे नुकसान झाले – चंद्रकांत पाटील


Shirur

शिरूर (प्रतिनिधी) : आयुष्यभर शामकांत चकोर यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या. पक्षवाढीसाठी प्रयत्न केले.त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले असल्याची भावना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलताना व्यक्त केली.

मांडवगण फराटा (तालुका शिरूर) येथील भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,भारतीय कृषी अनुसंधान समितीचे सदस्य शामकांत चकोर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.या निधनानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चकोर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी चंदकांत पाटील यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.
शिरूर तालुक्यात भारतीय जनता पार्टी च्या विस्तारात शामकांत चकोर यांनी मोलाचे योगदान दिले.तसेच पक्षात ही त्यांनी सातत्याने चांगले काम दाखवून दिले.चंद्रकांत पाटील व चकोर यांचे वैयक्तिक संबंध अत्यंत घनिष्ट होते.यामुळे चांगला सहकारी गमावला असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले.
या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, नवनाथ चकोर , लक्ष्मण चकोर , संभाजी चकोर , काळुराम चकोर , दीपक जगताप, उमेश चकोर यांसह चकोर कुटुंबीय उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed