Shirur : शिरूर तालुक्यातील वाळू तस्कर पांडुरंग गरुड एक वर्षासाठी स्थानबध पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांची माहिती कार्यवाहीमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले


Shirur

शिरूर दिनांक प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील वाळूतस्कर पांडुरंग नारायण गरुड याला एक वर्षासाठी एमपीडीए कायदा अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आली असल्याची माहिती पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली आहे.

       पांडुरंग उर्फ पांडा नारायण गरूड (रा. चव्हाणवाडी, करडे, ता. शिरूर, जि. पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या वाळू तस्कराचे नाव आहे.

शिरूर तालुक्यात खुलेआम सुरू असलेल्या अवैध वाळूधंद्याविरूद्ध वाळू तस्कर यांच्यावर शिरूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

        शिरूर तालुक्यातील बड्या वाळू तस्कराला ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिल्याने वाळूमाफीयांचे धाबे दणाणले आहेत. पांडुरंग उर्फ पांडा नारायण गरूड (रा. चव्हाणवाडी, करडे, ता. शिरूर, जि. पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या वाळूतस्कराचे नाव असून, त्याच्याविरूद्ध बेकायदा वाळू उपशाच्या गुन्ह्यांबरोबरच; बेकायदा बिगरपरवाना वाळूचोरी करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचा-यांना मारहाण करणे आदी १४ गुन्हे दाखल असून, वाळूतस्करीप्रकरणी महसूल विभागाने ११ वेळा त्याच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई केली 

असून,पांडुरंग उर्फ पांडा गरूड हा सराईत आरोपी असून, त्याची परिसरात दहशत असल्याने त्याच्याविरूद्ध कठोर कारवाईचा प्रस्ताव शिरूर पोलिसांनी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख व उपविभागीय पोलिस अधिकारी राहूलधस यांना सादर केला होता.

      पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी या प्रस्तावाची दखल घेऊन गरूड याला सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरेल अशा प्रकारचे कृत्य करण्यापासून प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने त्याला महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रवविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींची विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती, वाळू तस्कर व जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणा-या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंधक करण्याविषयीच्या (एमपीडीए) कायद्यान्वये एक वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.

           हाकार्यवाहीचा आदेश होताच पोलिस निरीक्षक राऊत, सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे, फौजदार गणेश जगदाळे, फौजदार हनुमंत पडळकर, फौजदार सुरेश गिते, फौजदार अभिजीत युवराज पवार यांच्या नेतृत्वाखालील संजू जाधव, अनिल आगलावे, नाथा जगताप, नितीन सुद्रीक, संजय साळवे, विजय जंगम, आण्णा गोपाळे व प्रतिमा नवले या पोलिस पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून गरूड याचा शोध घेतला व त्याला ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्याकामी त्याची आज येरवडा कारागृहात रवाणगी केली. 

शिरूर तालुक्यातील नदीकिना-यांवरून व इतर ओढे व सार्वजनिक स्तोत्रांच्या ठिकाणावरून बेकायदा वाळू उपसा होत असल्यास शिरूर पोलिसांशी संपर्क साधावा. संबंधितांची नावे गोपनीय ठेवून वाळूतस्करांवर कठोर कारवाई केली जाईल. बेकायदा वाळूउपशामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, नैसर्गिक स्त्रोत बदलून नूकसान होत आहे. हे रोखण्यासाठी बेकायदा वाळू उपशाविरूद्धची कारवाई आणखी कठोर केली जाईल असा इशारा शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed