Shirur : शिरूर तालुक्यातील मलठण आमदाबाद ८ मे पासून तर शिक्रापूर जांबुत पाबळ मांडवगण फराटा ही गावे १० मे पासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन दिलेला तारखेपर्यंत पूर्णपणे बंद

coronavirus corona virus background


Shirur

शिरूर दिनांक प्रतिनिधी

शिरूर तालुक्यात कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या जास्त असल्याने शिक्रापूर, जांबुत, मलठण व लाखेवाडी, आमदाबाद ,पाबळ, मांडवगण फराटा ,पाबळ ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली असून त्यांना दिलेल्या तारखेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र (पूर्णपणे कडकडीत बंद) म्हणून बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती शिरूर तहसीलदार लैला शेख यांनी दिली आहे.

याबाबतचे आदेश शिरूर प्रांतअधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिले आहे.

शिक्रापूर व पाबळ परिसरात मोठ्या प्रमाणात
रुग्ण संख्या वाढत असुन येथे अत्यावश्यक
वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने शिक्रापूर येथे
सोमवार दिनांक १० मे ते शुक्रवार १४ मे व पाबळ ऍक्टिव्ह रूग्ण संख्या ७३ आहे. १० मे ते २० मे, मांडवगण फराटा रुग्ण संख्या २२आहे.१० मे ते १३मे, आमदाबाद ऍक्टिव्ह रुग्ण संख्या १२आहे. ८ मे ते १५ मे, मलठण व लाखेवाडी ऍक्टिव्ह ३२रुग्ण संख्या आहे. ८ मे ते १७ मे, जांबुत ऍक्टिव्ह ३७ रुग्ण संख्या १० मे ते १७ मे
ही गावे दिलेल्या तारखेपर्यंत पूर्णपणे प्रतिबंधित संपूर्ण बंद राहणार आहेत.
 या कालावधीत फक्त अत्यावश्यक बाबी म्हणून  वैद्यकीय आस्थापना, दूध संकलन केंद्र सकाळीं ७ ते सकाळीं ९ या वेळेत सुरु रहातील, बँका व खताची दुकाने चालू राहतील. या काळात शेती विषयक सर्व कामे सामाजिक अंतराचे निकष पाळून सुरू राहतील असेही य प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी दिलेल्या आदेशात म्हटले असल्याचे तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले आहे.

 


1 thought on “Shirur : शिरूर तालुक्यातील मलठण आमदाबाद ८ मे पासून तर शिक्रापूर जांबुत पाबळ मांडवगण फराटा ही गावे १० मे पासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन दिलेला तारखेपर्यंत पूर्णपणे बंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed