Shirur : करडे ता शिरूर येथे गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केले जेरबंद पोलीस निरीक्षक अशोक शेळके


Shirur

शिरूर दिनांक प्रतिनिधी

करडे ता शिरूर येथे अवैधरित्या गावठी कट्टा (रिव्हॉल्व्हर) जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एकाला पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी पकडले असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा एक जिवंत काडतूस 36 हजाराचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली आहे.

      शुभम रामचंद्र वाबळे (राहणार करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

       

       पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख  यांनी पुणे जिल्ह्यामध्ये अवैद्य शस्त्रांची खरेदी-विक्री करणारे तसेच गणपती उत्सवाचा काळ असल्याने गोपनीय माहिती काढून अवैद्य शास्त्रांबाबत कारवाई करणे बाबत सूचना दिलेल्या होत्या.

        त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके  यांनी अशा प्रकारचे अवैद्य शस्त्रास्त्र खरेदी-विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे बाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांना सूचना दिल्या होत्या.

         शिरूर परीसरात स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक

गणपती विसर्जनाचे अनुषंगाने

शिरूर,रांजणगाव परिसरात गस्त करीत असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके व पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, भैरवनाथ मंगल कार्यालय करडे ता. शिरूर जि.पुणे येथे मंगल कार्यालय समोर  महेश भानुदास गायकवाड याचेकडे अग्निशस्त्र (गावठी कट्टा) आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याप्रमाणे तेथून त्यास ताब्यात घेऊन त्याच्या अंगझडती मध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळुन आले. ते पिस्टल त्याला शुभम रामचंद्र वाबळे राहणार करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे याने दिल्याचे सांगितले. आरोपी महेश भानुदास गायकवाड यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुसे 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    यातील रेकॉर्डवरील आरोपी महेश भानुदास गायकवाड याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. रांजणगाव पोस्टे गुरन 109/16 भादवि 380,पारनेर.पोस्टे जि अहमदगर 252/2021भादवि324,337सह आर्म अँक्ट4,25

   सदरची कामगिरी ही  .पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग  मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक  अशोक शेळके ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे 

सहाय्यक फौजदार पंदारे , पोलीस हवालदार जनार्दन शेळके, अजित भुजबळ, राजू मोमीन , पोलीस नाईक

मंगेश थिगळे, चंद्रकांत जाधव चालक पोकॉ अक्षय जावळे या पथकाने केली आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed