Shirur : शिरुर शहरातील ए वन लस्सी समोरील रस्त्याचे काम त्वरित करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार-शशिकला काळे


Shirur

शिरुर दिनांक प्रतिनिधी

शिरूर शहरातील एसटी बस स्थानक व शिवसेवा मंदिर यामधील रस्त्यावर ए वन लस्सी समोर अतिशय ओबडधोबड व उतार रस्ता झाला असून यामुळे अनेक अपघात घडले आहेत परंतु या रस्त्याचे काम करणारे सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार, नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करीत असून या रस्त्याचे काम सात दिवसात पूर्ण न केल्यास महिला संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका अध्यक्षा शशिकला काळे व महिला संघटनांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदनही शिरुर नगर परिषद नगराध्यक्ष वैशाली वाखारे, शिरूर तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना देण्यात आली आहे.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका अध्यक्षा-शशिकला काळे,रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्था अध्यक्षा – राणी कर्डिले, युवा स्पंदन अध्यक्षा – प्रियंका धोत्रे,कल्याणी फुलफगर, रुग्णहकक परिषद तालुका अध्यक्ष -सारिका विरसेव,वैशाली साखरे,छाया हारदे,प्रिया बिरादार,, नीता सतीजा,आशा मचाले,शोभा परदेशी,सरिता खेडकर,लता नाझिरकर , सई खैरे,राजश्री ढमढेरे उपस्थीत होते.

शहरातील सेंट्रल शाळा ते शिवसेवा मंदिर दरम्यान हा रस्ता असून शिरूर शहरांतर्गत रस्त्याचे काम सुरू असल्याने हा रस्ता एवन लस्सी सेंटर समोर खोदला असून, या रस्त्याची कुठली डागडुजी या ठेकेदाराने केली नसल्याने हा रस्ता ओबडधोबड झाला असून,ज्या ठिकाणी रस्ता खोदला आहे त्याठिकाणी सहा ते आठ फुटापर्यंत उतार आहे. त्यामुळे अनेक वेळा दुचाकी या रस्त्यावरून डायरेक्ट मुख्य रस्त्यावर येत असल्याने अनेक अपघात झाले आहे. अपघातात अनेक जण जखमीही झाले आहेत परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व शिरुर नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे.

या रस्त्याला नक्की वाली कोण असा सवाल सर्वत्र सुरू असून ठेकेदार आपला मुजोरपणा सोडत नसल्याने या ठिकाणी या रस्त्याचे तात्पुरते तरी दुरुस्ती करण्यास नकार देत आहे.

    शिरूर शहरातील रेवेन्यू कॉलनी, जिजामाता सोसायटी ,यशवंत कॉलनी, छत्रपती कॉलनी, सेंटर शाळा, रयत शाळा, सिटी बोरा कॉलेज, अनेक दवाखाने दुकाने यांचे नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करत असून, शिव सेवा मंडळ व एसटी स्टॅन्ड यांच्यामध्ये ए वन लस्सी सेंटर हा रस्ता खोदला असून या रस्त्याच्या खोदाईमुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात उतार झाला आहे. व खोदलेल्या ठिकाणी दगड विटा, डबर असे वरती आल्याने याठिकाणी वाहने घसरून पडत आहे तर अचानक उताराने खाली गेल्याने शहरांतर्गत रस्त्यावरून येणारे वाहने यांच्यात अपघात होत आहेत. तर अनेक जण ओबडधोबड रस्त्यावरून गाडीचा तो चुकून घसरून पडत आहे त्यामुळे अनेक अपघात घडूनही या रस्त्याचे काम करणारा मुजोर ठेकेदार व रस्त्याचे काम करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी डोळ्यावर पट्ट्या बांधल्या आहेत का असा सवाल महिला संघटनांनी केला आहे. या रस्त्याचे काम सात दिवसात न झाल्यास मुजोर ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या निषेधार्थ पुणे नगर रस्ता येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनात महील संघटनांनी दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed