Shirur : शिरूर शहरात आज पासून रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी (अँटीजेन टेस्ट) करण्यात येणार


Shirur

शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण व त्यांचे नातेवाईक संपर्कात येणारे सुपर स्प्रेडर फिरत कोरोना रुग्ण वाढत असल्याचे शहरात आज पासून रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी (अँटीजेन टेस्ट)  करण्यात येणार असून यात पॉझिटिव आढळल्यास थेट कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
    शहरात वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल व नगराध्यक्ष वैशाली वाखारेे, यांनी शहरातील कोरोना रोखण्यासाठी कडक भूमिका घेण्याचे ठरवले आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
         शिरूर शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळतात रुग्णांची नातेवाईक व स्वतः कोरोना बाधित रुग्ण फिरत असल्याच्या अनेक तक्रारी नगर परिषदेला प्राप्त झालेले आहेत. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले अनेक जण असे सर्व सुपर स्प्रेडर फिरल्याने मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा पादुर्भाव वाढत आहे.
तसेच अनेक जण विनामास्क , विनाकारण शहरात गल्लीत फिरताना दिसत आहे. अनेक वेळा सांगू नये हे नागरिक ऐकत नसल्याने व यामुळे कोरोना संसर्गाचा पादुर्भाव एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होण्यास मदत होते. हा पूर्ण पादुर्भाव व सुपर स्प्रेडर नागरिक शोधण्यासाठी शिरूर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल व नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांच्या मार्गदर्शनानुसार शहरात फिरणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी (अँटीजेन टेस्ट) करण्यात येणार आहे 
या पॉझिटिव्ह रुग्णांना कोवीड केअर सेंटर येथे भरती करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
       शिरूर शहरात कोरोना बाधित रुग्ण व त्यांचे नातेवाईक फिरत असल्यास याबाबत तात्काळ शिरुर नगर परिषद यांच्याशी संपर्क साधावा. तसेच कोरोना लक्षणे असणाऱ्यांना नागरिकांनी तात्काळ शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. असे आवाहन करण्यात आले.
वैशाली वाखारे नगराध्यक्ष शिरूर नगर परिषद

1 thought on “Shirur : शिरूर शहरात आज पासून रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी (अँटीजेन टेस्ट) करण्यात येणार

  1. सर्व साधारण शिरुर शहराचा कोरोना बाधीत बातम्या व सर्वेवरुन लक्षात आले सरासरी आज् दिवसाला 100 रूघ्ण सापडतात या वाढत्या प्रमाणास…शि.न.पा. व शि.तलहसील प्रशासण सक्षम आहे….? आज् शहरा च्या जवळपास म्हणजे नगरपालीका हद्दीत सर्व कोविड सेंटर मीळुन एकुण बेड कीती…? जर दररोज् चे एव्हरेज् असेच 15दिवस राहिलेतर सर्वांना आँक्सीजन पुरवठा होईल का…? माझा मुद्दा समजुन घ्या… जनतेस समजुद्या की प्रशासन सर्वशक्तीने तयार नाही… मगच जनता आपली काळजी घेतील असे मला वाटते…! सत्य परीस्तीती जनतेसमोर मांडा नंतर व्यह्यक्सीन असेल, रेमडेसीवीर असेल, आँक्सीजन सीलेंडर,आँक्सीजन किट असेल,व्हेंटीलेटर असेल… हे याच नेटवर्क च्या माध्यमातुन प्रसारीत करावे… म्हणजे गंभीरता जनतेच्या लक्षात येईल…💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed