Shirur : शिरूर शहरातील नगरपरिषद सेंटर शाळा ते पारधी वस्ती पर्यंत झालेल्या रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना धोका


Shirur

शिरुर दिनांक प्रतिनिधी

     शिरूर शहरातील नगरपरिषद सेंटर शाळा ते पारधी वस्ती पर्यंत झालेल्या रस्त्यावर भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या दुचाकी स्वार यांच्या राईट मुळे पादचारी व या भागात फिरणाऱ्या नागरिक महिला लहान मुले यांचा जीव धोक्यात आला असून यासाठी शिरूर नगर परिषदेने या रस्त्यावर अडथळे टाकावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
        शिरूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नगर परिषद शाळा ते पारधी वस्ती यादरम्यान महत्त्वाच्या असलेला रस्ता अतिशय सुंदर केला असून रस्त्याच्या मधोमध डीवाईडर व विद्युत दिवे लावून सुंदर केला आहे याबाबत शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेची कौतुकही केले आहे.
या रस्त्यावर शिरूर नगरपरिषद सेंटर शाळा, रयत शाळेचे मैदान, राजमाता जिजामाता गार्डन, रयत शाळा, शहरातील मोठे असलेले संभाजीनगर हुडको कॉलनी, यशवंत कॉलनी छत्रपती शिवाजी कॉलनी सैनिक सोसायटी, सिटी बोरा कॉलेज या कडे जाणारे महिला मुली विद्यार्थी-विद्यार्थिनी वृद्ध महिला पुरुष यांची वर्दळ असते.
         परंतु अतिशय सुंदर असलेल्या या रस्त्यावर दुचाकीस्वार यांनी हैदोस घातला असून भरधाव वेगात वाहने चालवून पायी चालणारे पादचारी लहान मुले,खेळाडू, शालेय विद्यार्थी कॉलेज तरुण-तरुणी महिला वर्ग जिजामाता गार्डन या ठिकाणी येणारे नागरिक यांचा जीव मात्र यामुळे टांगणीला लागला आहे. या रस्त्यावर नगर परिषदेच्या वतीने लवकरात लवकर अडथळे टाकावेत अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
        भरधाव वेगात जाणारे वाहन चालक यांच्या वाहनाच्या गतीमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला जात आहे. वाहनचालकांना बंदोबस्त करण्यासाठी या रस्त्यावर ठिकाणी अडथळे टाकून वाहनांचा वेग कमी होईल यामुळे भविष्यात होणार आहे एखादा मोठा अपघात एखाद्याचा जीव जाण्याअगोदर थांबला जाईल त्यामुळे नगरपरिषदेने याची वेळीच दखल घेऊन या रस्त्यावर दोन्ही बाजूने विविध ठिकाणी अडथळे टाकावेत.
        नुकताच काल दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी दुचाकीस्वारांचा  अपघात या ठिकाणी जिजामाता गार्डन समोर झाला असून, या अपघातात एक जण जखमी झाला आहे. तर दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा प्रकारचे अपघात होऊ नये व एखाद्याचा जीव जाऊ नये यासाठी नगरपरिषदेने वेळीच दखल घ्यावी अशी मागणी नागरिकामधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed