Shirur : शिरूर भूमी अभिलेख मध्ये भुकर मापकास पाच हजाराची लाच स्वीकारताना अटक


Shirur

शिरूर, दिनांक (प्रतिनिधी) 

शिरूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात जमिनीच्या मोजणीसाठी पाच हजारांची लाच मागणाऱ्या भूकरमापकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,यातील तक्रारदार यांनी जमीन मोजणीसाठी अर्ज केला होता.जमीन मोजणी करून देण्याचा मोबदला म्हणून भूकर मापक प्रशांत मोहन कांबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिरूर भूमी अभिलेख येथे सापळा रचून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना कांबळे यास रंगेहाथ पकडले.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भारत साळुंखे हे करत आहे.

ही कारवाई पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed