Shirur : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे महाराष्ट्र बँकेवर सशस्त्र दरोडा दोन कोटी 31 लाखाचा ऐवज चोरून


Shirur

शिरूर दिनांक प्रतिनिधी

 पिंपरखेड तालुका शिरूर येथे बँक ऑफ महाराष्ट्रवर 

भरदिवसा  रिव्हॉल्व्हर चा धाक दाखवत बँक कर्मचाऱ्यांना मारहाण करत पाच दरोडेखोरांनी बँकेवर दरोडा टाकून २ कोटी किमतीचे सोने व ३१ लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना दुपारी दीडच्या दरम्यान घडली. शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    दरोडेखोरांच्या गाडीवर प्रेसचा मोठा बोर्ड असल्याचे समजते. दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांनी काळे जर्किंग डोक्यापर्यंत पूर्ण व तोंडाला मास्क लावल्याचे दिसून येत आहे.

        पिंपरखेडच येथेआज दिनाक २१ ऑक्टोबर दुपारी दिड वाजता तोंड बांधलेले पाच दरोडेखोर हातात रिव्हॉल्व्हर घेऊन महाराष्ट्र बँकेत घुसले.यावेळी बँकेतील कर्मचाऱ्यांना हाताने मारहाण करुन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लॉकरच्या चाव्या घेतल्या आणि लॉकर मधील सर्व २ कोटी चे सोने व ३१ लाख रुपयांची रक्कम पोत्यात भरून बाहेरील सफेद रंगाच्या चार चाकी कार ने पिंपरखेड गावातून वेगात गाडी घेऊनपसार झाले.

        यावेळी कर्मचारी यांनी बाहेर येऊन आरडाओरडा केल्याने गावातील नागरिकांनी बँकेकडे धाव घेतली. यावेळी या घटनेची माहिती शिरूर पोलीसांना मिळाल्यानंतर तत्काळ नाकाबंदी करण्यात आली.व्यवस्थापक मोहित चौहान, सागर पानमंद,गणेश खैरे,हरि काळे या कर्मचाऱ्यांना दरोडेखोरांनी मारहाण केली.शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी घटनास्थळी भेट घेऊन सीसीटीव्ही फुटेजची पहाणी व चौकशी सुरु केली आहे.दरम्यान काठापूर येथे एका हॉटेलमध्ये घुसून महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे सोने हिसकावून चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

पिंपरखेड पासुन शिरूर पोलिस स्टेशन सुमारे ४५ किमी अंतरावर आहे घटना समजताच पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत घटनास्थळी हजर झाले. पुणे व नगर जिल्ह्यांची नाका बंदी करण्यांची सुचना देण्यात आली असुन पोलिस पुढील तपास करीत आहेत मात्र या परीसरात दिवसा प्रथमच दरोडा पडला असून या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात अनेक वित्तीय संस्था व बँका कार्यरत असून त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या परिसरातला शिरूर पोलीस स्टेशन खूप दूरवर पडत असून टाकळी हाजी येथे नव्याने पोलीस स्टेशन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे मात्र हा प्रस्ताव कधी मंजूर होणार याची प्रतीक्षा जनतेला लागली आहे. गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे याबाबत वेळोवेळी मागणीही करण्यात आली आहे. या भागात चोऱ्या, दरोडे या घटना घडत असुन अवैध धंद्यांना ही ऊत आल्याने सामान्य नागरिकांनी या भागात स्वतंत्र पोलिस स्टेशन व्हावे अशी मागणीही आता जोर धरत आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed