Shirur : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्यावतीने दिवाळीनिमित्त गरजूं महिलांना किराणा किट चे वाटप


Shirur

शिरूर दिनांक (प्रतिनिधी)-

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्यावतीने एक हात मदतीचा या उपक्रमातून 25 गरजु कुटुंबाला किराणा साहित्य देण्यात आले.

काही दिवसावरच दिवाळी आली आहे. दीपावली हा भारतातील मुख्य सण आहे. प्रत्येक जण आप आपल्यापरीने दिवाळी साजरी करत असतो.परंतु सध्या कोरोना महामरिमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलेआहे. कित्येक जणांचे प्राण या महामारीत गेले आहेत. तसेच कित्येक कुटुंबातील कर्ता पुरुष हिरावून नेला आहे.

काही कुटुंब आर्थिक परस्थितीमुळे दिवाळी सुद्धा साजरी करू शकत नाहीत. अशा गरजु कुटुंबाला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या शशिकला काळे व त्यांच्या सहकारी महिला यांनी एक हात मदतीचा या उपक्रमातून गरजु महिलांनाची दिवाळी गोड करण्यासाठी 25 गरजू कुटुंबाला किराणा किटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका अध्यक्ष प्रदीप उर्फ आबासाहेब सोनवणे, उपसरपंच अभिलाष घावटे, माजी उपसरपंच सागर घावटे, माजी सरपंच रामदास जामदार, ग्रामपंचायत सदस्य यशवंत कर्डीले, वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष विनोद भालेराव, प्रसिद्धी प्रमुख अनिल सोनवणे,शहराध्यक्ष अनिल डांगे, पालक संघटना अध्यक्ष नाथाभाऊ पाचर्णे, सागर नरवडे, नंदु जाधव, बाबा जाधव, सरचिटणीस सावळाराम आवारी, नगरसेविका मनीषा कालेवर, जिल्हा परिषद सदस्या कोमल वाखारे, शर्मिला निचित, सुनंदा लंघे,उज्वला फलके, आशा पाचंगे, लता नाझिरकर,मीना गवारे,मनीषा तरटे, राणी कर्डीले, ज्योती हांडे,सुवर्णा सोनवणे,राणी शिंदे,छाया हर्दे,मनीषा पठारे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन नीचित यांनी केले तर आभार अनिल डांगे यांनी मानले.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed