Shirur : शिरूर शहरात पुरुषावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल


Shirur

शिरुर दिनांक प्रतिनिधी

शिरूर शहरात  भर रस्त्यावर एस . टी . स्टँड जवळ नरेंद्र सायकल समोर जुन्या जमिनीच्या व्यवहारातुन एकावर कोयत्याने हल्ला केल्या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

     यामुळे शिरूर शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

        सचिन उर्फ मुन्ना प्रविणचंद्र रावल( वय ४५ वर्षे रा . शिरूर वाडा कॉलनी, शिरूर तालुका शिरूर) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले चे नाव आहे.

     हल्ला केल्याप्रकरणी  संभाजी बाजीराव कर्डीले (रा. थापेमळा, शिरूर) याच्या वर शिरूर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

जखमी सचिन रावळ यांच्यावर शिरुर येथील वेदांता हॉस्पिटल येथे प्राथामिक उपचार करून पुणे येथील रुबी हॉस्पिटल येथे पुढील उपचार करण्यात येत आहेत .

या बाबत जखमीचा भाऊ अविनाश प्रविणचंद्र रावल वय ४७ वर्षे व्यवसाय गाडी खरेदी विकी रा. फलॅट नं. ३०३ तीसरा मजला तिमृती संगम बिल्डींग, राणे स्कुल मागे, संगमवाडी शिवाजीनगर पुणे यांनी शिरुर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार शिरूर पोलिसांनी दिलेली माहीती अशी की,

सोमवार दि. ११ रोजी सकाळी ११.०० वा. चे सुमारास  शिरूर बस स्थानकालगत नरेंद्र सायकल मार्ट, समोर संभाजी बाजीराव कर्डीले रा. थापेमळा, शिरूर ता. शिरूर जि. पुणे याने जुन्या जमीनीचे व्यवहाराचे कारणावरून फिर्यादीचा भाऊ सचिन उर्फ मुन्ना हा त्याचे स्कुटी मोटर सायकल वर बसलेला असताना पाठीमागुन पाठीत दगड मारून त्याचे कडील कोयत्या सारखे हत्याराने ” संपवतोच ” असे म्हणुन  सचिन रावल यास जीवे ठार मारण्याचे उददेशाने डोक्यात वार केला असता  सचिन रावल याने हातावर झेलल्याने उजव्या हातास मोठी जखम झाली असुन त्यांनतर त्याने सचिन रावल याचे कंबरेवर वार केला असता तेव्हा तो  रावल याचे कंबर बेलटला लागल्याने छोटी जखम झाली असुन संभाजी कर्डीले याने  सचिन रावल याचे मानेवर वार केला असता तो त्याने हुकवला असता त्यांचे दंडावर निसरता कोयत्या लागल्याने छोटी जखम करून जीवे मारण्याचा प्रयत्न केले बाबत फिर्यादी नुसार शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे करित आहेत .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed