Shirur :रांजणगाव गणपती शिरूर व पुणे जिल्ह्यात रोहित्र चोरट्यांचे रॅकेट रांजणगाव पोलीसांकडून जेरबंद पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची माहिती


Shirur

रांजणगाव गणपती शिरूर व पुणे जिल्ह्यात रोहित्र चोरट्यांचे रॅकेट रांजणगाव पोलीसांकडून जेरबंद पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची माहिती

शिरूर दिनांक प्रतिनिधी

रांजणगाव औद्योगिक पोलीस स्टेशन व पुणे जिल्ह्यामध्ये रोहित्रांची (इलेक्ट्रीक डि.पी.) रेकी करून त्याच्यातील तांब्याच्या तारा चोरी करण्यासाठी चोरट्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात चोरी करणारे भंगार विक्रेते व चोरटे अशा नऊजणांच्या रांजणगाव पोलीस स्टेशनने मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून पाच लाख 98 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

सचिन उर्फ गुलट्या सुभाष काळे (वय 21 वर्षे) आकाश उर्फ गोट्या सुभाष काळे (वय 19 वर्षे, ) साहिल उर्फ नट्या उर्फ शैलेश सुधाकर भोसले (वय 20 वर्षे एक विधिसंघर्षीत बालक सर्व रा. गणेगाव खालसा,ता.शिरुर,जि.पुणे) व भंगारदुकानदार उमेश यादव बलिकरण यादव( वय 19 वर्षे,) ,गोविंद यादव हनुमान यादव( वय 21 वर्षे दोन्ही सध्या रा.कोंढापुरी, ता.शिरुर,जि.पुणे) ,करिमउल्ला अतिउल्ला मनियार (वय 21 वर्षे,सध्या रा. खंडाळेमाथा, रांजणगाव, ता.शिरुर,जि.पुणे) ,घरभरण यादव औधराम यादव (वय 36 वर्षे, 5) आकरम यासिन रंगरेज वय 50 वर्षे, दोन्ही सध्या रा.शिक्रापुर,ता.शिरुर,जि.पुणे)नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

    रोहित्र (इलेक्ट्रीक डि.पी.)मधील तांब्याच्या तारा चोरांसह चोरीचा माल विकत घेणा-यांच्या रांजणगाव MIDC पोलीसांनी मुस्क्या आवळल्या असल्या तरी या रॅकेटच्या मुळाशी पोलीस खाते जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले असून रोहित्र चोरीचे मोठे रॅकेट रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या पथकाने पकडले असल्याने पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी 

त्यांचे कौतुक केले.

       रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये मागील एक ते दिड वर्षामध्ये इलेक्ट्रीक डि.पी.मधील तांब्याच्या तारा व पट्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली होती. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक बारामती मिलिंद मोहिते यांनी तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राहुल धस सो. यांनी डि.पी.चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्याकरीता आदेश दिलेले होते. वरिष्ठांचे आदेशानुसार पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये वेगवेळी तपास पथके कार्यन्वित करण्यात आलेली होती. मा.पोलीस अधिक्षक सो.यांचे आदेशानुसार रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी स्वतंत्र तपास पथकाची नियुक्ती करुन पोलीस स्टेशनला दाखल असलेले डि.पी.चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार तपास पथकामधील पोलीस पोलीस अंमलदार पो.हवा.विजय सरजिने, पो.काँ.विजय शिंदे, पो.काँ.उमेश कुतवळ, पो.हवा.संतोष औटी यांनी गोपनिय बातमीच्या आधारे आरोपी सचिन उर्फ गुलट्या सुभाष काळे (वय 21 वर्षे) आकाश उर्फ गोट्या सुभाष काळे (वय 19 वर्षे, ) साहिल उर्फ नट्या उर्फ शैलेश सुधाकर भोसले (वय 20 वर्षे एक विधिसंघर्षीत बालक सर्व रा. गणेगाव खालसा,ता.शिरुर,जि.पुणे) यांना ताब्यात घेवुन तपास केला असता त्यांनी रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दील एकुण 09 डि.पि.चोरीचे तसेच घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याने त्यांना दि.13/09/2021 रोजी अटक करण्यात आलेली आहे. सदर अटक आरोपीतांनी ज्या भंगारदुकानदारांना सदर डि.पी.चोरीतील तांब्याताच्या तारा व पट्टा विकल्या आहेत ते भंगारदुकानदार उमेश यादव बलिकरण यादव( वय 19 वर्षे,) ,गोविंद यादव हनुमान यादव( वय 21 वर्षे दोन्ही सध्या रा.कोंढापुरी, ता.शिरुर,जि.पुणे) ,करिमउल्ला अतिउल्ला मनियार (वय 21 वर्षे,सध्या रा. खंडाळेमाथा, रांजणगाव, ता.शिरुर,जि.पुणे) ,घरभरण यादव औधराम यादव (वय 36 वर्षे, 5) आकरम यासिन रंगरेज वय 50 वर्षे, दोन्ही सध्या रा.शिक्रापुर,ता.शिरुर,जि.पुणे). यांना सदर डि.पी.चोरीच्या गुन्ह्यांमध्ये दि. 14/09/2021 रोजी अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यातील अटक आरोपीतांकडुन मौजे रांजणगाव, खंडाळे, गणेगाव खालसा,कर्डीलवाडी, निमगाव भोगी,कारेगाव व खंडाळेमाथा येथील एकुण 09 डि.पि.चोरीच्या गुन्ह्यातील एकुण 426 कि.ग्रँ.वजनाच्या इलेक्ट्रीक डि.पी.मधील एकुण 2,98,200/ रु. किंमतीच्या तांब्याच्या तारा व पट्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच आरोपींनी सदरचा गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहने 1) टाटा कंपणीचा अँशे टेंम्पो क्र. MH 12 GT 343 (2) महेंद्रा मँक्सीमो टेम्पे MH 06 BG 0124 3) टाटा कंपणीचा अँशे टेम्पो क्र. MH 12 DG 8323 (4) महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. MH 47 Y 5134 अशी एकुण चार वाहने किंमत रु. 3,00,000/रु.ची जप्त करण्यात आलेली आहेत. सदर गुन्ह्यामधील चोरीस गेला मुद्देमाल व वाहने असा एकुण 5,98,200/रु. किंमतीचा मुद्देमाल अटक आरोपींकडुन जप्त करण्यात आलेला आहे. सदर अटक आरोपीतांनी रांजणगाव पोलीसांना अशाच प्रकारचे डि.पी.चोरीचे गुन्हे शिक्रापुर,शिरुर व यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केल्याची कबुली दिलेली आहे. रांजणगाव MIDC पोलीसांनी डि.पी.चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केल्याने परिसरातील शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे. सदरची कामगीरी मा. अभिनव देशमुख सो.पोलीस अधिक्षक सो.पुणे ग्रा, मा. मिलिंद मोहिते सो. अप्पर पोलीस अधिक्षक बारामती, श्री.राहुल धस सो.उपविभागीय पो.अधिकारी दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.बलवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक श्री.सुहास रोकडे, पो.काँ. उमेश कुतवळ,पो.काँ.विजय शिंदे, पो.हवा.विजय सरजिने, पो.हवा.विलास आंबेकर, पो.हवा. संतोष औटी, पो.काँ.रघुनाथ हाळनोर,पो.हवा.वैज्जनाथ नागरगोजे, पो.हवा.वैभव मोरे, चा.पो.ना.ज्ञानेश्वर शिंदे, पांडुरंग साबळे यांनी केली असुन सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पो.हवा.विजय सरजिने रांजणगाव पो.स्टे. हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed