Shirur :शिरूर वीजवितरण कार्यालया समोर शेतीपंपाचे विज कनेक्शन तोडण्याच्या अन्याया विरोधात दि २३ जानेवारी पासुन भाजपचे सत्याग्रह आंदोलन


Shirur
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावर महावितरण ने चालविलेल्या शेतीपंपाचे विज कनेक्शन तोडण्याच्या अन्याया विरोधात दि २३ जानेवारी पासुन सत्याग्रह आंदोलन करत २३ ते २५ जानेवारी पर्यंत धरणे आंदोलन करण्याचा इशारा भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी पत्रकार परिषदेत दिला .
या संदर्भात एक निवेदन कार्यकारी अभियंता कार्यालय महावितरण केडगाव यांना दिले आहे. या पत्रकार परिषदेला पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे , शिरूर तालुका सरचिटणीस माऊली बहिरट , कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे , सुरेश थोरात , उद्योग आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष वर्षा काळे , सह प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्याक रेश्मा शेख ,तालुका संपर्क प्रमुख बाबुराव पाचंगे , उमेश शेळके ,विजय नर्के ,मितेश गादिया उपस्थित होते
या वेळी बोलताना संजय पाचंगे यांनी सांगितले कि महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे शेत्री पंपाचे विज बिल थकीत असलेचे कारणावरुन सरसकट विज कनेक्शन तोडणी सुरु केलेली असून, डी. पी. कनेक्शनही बंद करण्याचे काम सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खरीपाची पीके अंतिम टप्प्यात असल्याने व रब्बीची सेरणी लागवड कालावधी असल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. हा तुगलकी निर्णय व सुरु असलेली कारवाई ही शेतकऱ्यांवर अन्याय कारक वे एकतर्फी आहे विज नियम व अधिनियमाची अमलबजावणी करावयाची तर सर्व नियमांची करणे आवश्यक आहे. परंतु सध्या केवळ थकीत विज बिल या एकाच नियमाची अमलबजावणी महावितरण कडून सुरु आहे व ती शेतकन्यावर अन्याय करणारी व आर्थिक शोषण करणारी आहे.
यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी, उद्योग आघाडी पुणे जिल्हा ग्रामीण च्या वतीने दि. २३ जानेवारी २०२२ पासून सत्याग्रह आंदोलन सुरु करीत आहे.या आंदोलनाचा पहिला टप्पा २३ जानेवारी ते २५ जानेवारी २०२२ धरणे आंदोलन व दुसरा टप्पा अमरण उपोषण अशा स्वरूपाचे आंदोलन असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.
या आंदोलनातील प्रमुख मागण्या शिरुर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे शेती पंपाचे विज कनेक्शन व डी. पी. कनेक्शन ताबडतोब सुरु करण्यात यावेत,
शेतकऱ्यांच्या शेतातील विज पोल, ट्रान्सफार्मर, हायटेन्शन टॉवर पोल, याचे नियमाप्रमाणे पहिल्या दिवसापासूनचे भाडे, त्यावरील व्याज व फरकाची रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांना देण्यात यावी. शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांची डी.पी. बसविल्याचा दिनांक, स्थळ, डी. पी. नादुरुस्त किती वेळा झाली, किती वेळा बदलली, किती वेळा दुरुस्त केली, त्यासाठी किती खर्च आला, याबाबत वरीष्ठ कार्यालयाला दिलेला अहवाल, वरीष्ठ कार्यालयातून खर्चाची मिळालेली मंजूरी याची माहिती दयावी आदी प्रमुख मागण्या सह अनेक मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहे .